बहुजन विरुद्ध अभिजन, नवा वाद उफाळला! भाजपमध्ये मतभेद...

Nagpur University News
Nagpur University News

Nagpur University News : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावरून आता बहुजन विरुद्ध अभिजन असा नवा वाद निर्माण केला जात आहे. प्रत्येक जण सोयीने याचा वापर करीत असल्याने भाजपचेच आमदार अडचणीत आहेत.

कुलगुरूंच्या बचावासाठी विद्यापीठ शिक्षण मंचने पुढाकार घेतला आहे. हा मंच संघ पुरस्कृत आहे. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा या मंचमध्ये समावेश आहे. मंचच्या नेत्या माजी महापौर कल्पना पांडे आहेत.

एमकेसीएल कंपनीच्या अनियमिततेची चौकशी सुरू असल्याने निकालासंदर्भात कुठलेही काम देऊ नये असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतरही कुलगुरूंनी आदेशाकडे दुर्लक्ष केले आणि त्याच कंपनीला काम दिले. हा विषय भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कुलगुरूंवर कारवाई करावी याकरिता राज्यपालांकडे संपूर्ण माहिती सादर करण्यात आल्याचे सांगितले. (latest nagpur news)

सोबतच यासंदर्भात लवकरच चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेशही नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात दिलेत. त्यानुसार कुलगुरूंवर निलंबनाची तलवार लटकलेली असताना शिक्षण मंचने कुलगुरूच्या समर्थनार्थ मोर्चा उघडला आहे. विविध प्राधिकरणातील त्यांचे सदस्य राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कुलगुरुंवरचे आरोप खोटे असल्याचे पटवून दिल्या जात आहे.

Nagpur University News
Prithviraj Chavan : नवाब मलिकांवर दबाव, जामिनामागं मोठं राजकारण; माजी मुख्यमंत्र्यांच्या मनात वेगळाच संशय

या संदर्भात मंचची विद्यापीठात बैठक झाली. त्यात करण्यात आलेल्या तक्रारीत भाजपचे आमदार आणि भाजपशी संबंधित काही पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे कळते. आता या मुद्याला ओबीसी विरुद्ध सवर्ण असा रंग देऊन हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न केला जात असल्याचे समजते. (latest marathi news)

भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासोबत संपर्क साधला असता कुलगुरू यांच्याशी कुठलाही वैयक्तिक वाद नसल्याचे सांगितले. एमकेसीएलचे काम बंद करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतरही याच कंपनीला काम देण्यात आले. या प्रकरणाची बाविस्कर समितीने चौकशी केली. तसा अहवाल सादर केला आहे. शिक्षण मंचला हे कुलगुरुंविरुद्ध षडयंत्र वाटत असेल तर चौकशी समितीचा अहवाल खोटा असल्याचे सिद्ध करावे.

Nagpur University News
Devendra Fadanvis: अजित पवार- शरद पवारांच्या गुप्त बैठकीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले,'या भेटीबाबत मला...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com