Prithviraj Chavan : नवाब मलिकांवर दबाव, जामिनामागं मोठं राजकारण; माजी मुख्यमंत्र्यांच्या मनात वेगळाच संशय

मलिकांच्या जामिनाला कोणत्याही ईडी, सीबीआय, एनआयइ तपास यंत्रणेनं केला नाही विरोध
Prithviraj Chavan Nawab Malik Bail
Prithviraj Chavan Nawab Malik Bailesakal
Summary

नवाब मलिक यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. त्यांना नुकताच जामीन मिळाला आहे.

कऱ्हाड : माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन देण्यामागे राजकारण असावे. मलिकांवर दबाव आणून राजकीय भूमिका घ्यायला भाग पाडले असावे. कारण त्यांच्या जामिनाला ईडी, सीबीआय, एनआयइ व अन्य कोणत्याही तपास यंत्रणेने विरोध केलेला नाही. त्यांनी विरोध न करणे हे बरेच काही सूचक आहे, असा संशय माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.

आमदार चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘नवाब मलिक यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. त्यांना नुकताच जामीन मिळाला आहे. ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटाबरोबर जातील, हे ते जाहीर करतील. त्यांची प्रकृती खराब आहे. मात्र, त्यांना जामीन मिळण्यामागे राजकारण असावे, अशी शंका आहे.

Prithviraj Chavan Nawab Malik Bail
Loksabha Election : काँग्रेस कर्नाटकात लोकसभेच्या 'इतक्या' जागा जिंकणार; मुख्यमंत्र्यांनी आकडाच सांगून टाकला

मलिकांवर (Nawab Malik) दबाव आणून राजकीय भूमिका घ्यायला भाग पाडले असावे. कारण त्यांच्या जामिनाला ईडी, सीबीआय, एनआयइ व अन्य कोणत्याही तपास यंत्रणेने विरोध केलेला नाही. त्यांनी विरोध न करणे हे बरेच काही सूचक आहे. ब्रिटिशांच्या काळात झालेले देशातील तीन कायदे केंद्र सरकारकडून बदलण्यात आले. भारतीय दंड संहिता हा १९६० चा कायदा सुरू होता. तो देशाच्या हितासाठी कायदा करण्यात आलेला होता. त्या कायद्याने न्याय व्यवस्था चालवली जात होती, असंही ते म्हणाले.

चव्हाण पुढे म्हणाले, इंडियन एव्हिडन्स कायदा, क्रिमिनल प्रोसिजर कोड या कायद्यात फार थोड्या प्रमाणात बदल करण्यात आले होते. त्याची नावे बदलून कलमांचे नंबर बदलण्यात आले आहेत. आम्ही ब्रिटिश काळचा कायदा बदलला, असे सांगून साप म्हणून भुई धोपट्याने काम सुरू आहे. हा अत्यंत बालिश प्रयत्न आहे. हा कायदा बदलण्याचे काय कारण नव्हते.

Prithviraj Chavan Nawab Malik Bail
Bhai Jagtap : संभाजी भिडेंना 'माथेफिरू' हा शब्दही सौम्य झालाय; काँग्रेस आमदाराची सडकून टीका

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तुम्ही मनुस्मृती पुन्हा देशात, राज्यात आणणार आहात का? ही मनुस्मृती काढून टाकून लोकशाहीचे राज्य आणले असताना त्यावर घाव घालण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. हे काहीही जर केले तरी नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या, तर मोदी आणि शहा हे सत्तेत राहू शकत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जालन्याचे काँग्रेस आमदार राजेश राठोड यांना पोलिस संरक्षण द्यावे, तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Prithviraj Chavan Nawab Malik Bail
Chitra Wagh : भाजप सरकार आलं म्हणून महिलांवर अत्याचार वाढलेत, असं म्हणायचं का? चित्रा वाघ यांचा थेट सवाल

काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न असफल

काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नेहमीच सुरू असतात, असे सांगून आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘देशभर ते हे प्रयोग करत असतात. एकंदर काँग्रेसमुक्त भारत असे जे भाजपचे स्वप्न आहे, ते कधीही पूर्ण होणार नाही. काँग्रेसचा कोणताही मोठा नेता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण २०२४ ला भाजप सत्तेत येईल, अशी खात्री कोणालाच नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com