esakal | विद्यार्थ्यांनो! विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा स्थगित

बोलून बातमी शोधा

exam
विद्यार्थ्यांनो! विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा स्थगित
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचे संक्रमण वाढतच चालल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्व हिवाळी परीक्षा स्थगित केल्या आहेत. नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना २५ मार्चपासून सुरुवात झाली होती. कोरोनामुळे विद्यापीठाने आधीच या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. सध्या विद्यापीठाच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहेत. मात्र, काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा: गर्भवती मातांनो, कोरोना विषाणूंचा बाळाला धोका नाही; नियमाचं करा पालन

नागपूर जिल्ह्या यात आघाडीवर आहे. विद्यापीठाच्या अखत्यारित नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया ही चार जिल्हे येतात. या चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. अनेक परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाइकांना करोना संक्रमण झाले आहे. अनेकजण दगावले आहेत. अशा स्थितीमध्ये परीक्षा देणे विद्यार्थ्यांनाही सोयीचे नाही. त्यामुळे विद्यापीठाने तात्पुरत्या परीक्षा रद्द कराव्या अशी मागणी समोर येत होती. विधिसभा सदस्या अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी विद्यापीठाला परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली होती. तसेच काही महाविद्यालयांनीही तसा प्रस्ताव विद्यापीठाला दिला होता. त्यामुळे विद्यापीठाने सध्या सुरू असलेल्या सर्व ऑनलाइन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षांमध्ये बीसीए प्रथम सत्र, बीएस.स्सी. प्रथम सत्र, बॅचलर ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, बीबीए प्रथम सत्र, बीसीसीए प्रथम सत्र, बी.कॉम. प्रथम सत्र, बीएसडब्लू, बीए एलएलबी या विषयांचा समावेश आहे. परीक्षांच्या पुढील तारखा विद्यार्थ्यांना लवकरच कळवण्यात येतील अशी माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली.