
Nagpur University
Sakal
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विधी महाविद्यालयात केवळ सहा कायमस्वरूपी प्राध्यापक असून तब्बल २६ शिक्षक हे तासिका तत्त्वावर (व्हिजिटिंग फॅकल्टी) कार्यरत असल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात समोर आली. नियमित प्राध्यापकच नाही तर गुणवत्ता कशी राखाल, तसेच तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक करताना गुणवत्तेच्या दृष्टीने निकष काय असतात, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत एकंदर या विषयावर उचललेल्या पावलांवर माहिती सादर करण्याचे आदेश विदर्भातील विद्यापीठांना दिले.