

Dr. Manali Kshirsagar appointed as the first woman vice-chancellor of Nagpur University
Sakal
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कुलगुरू होण्याचा मान यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तांत्रिक संचालक तथा सल्लागार डॉ. मनाली क्षीरसागर यांनी मिळवला आहे. महाराष्ट्राचे अंतरिम राज्यपाल तथा गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी रविवारी (३० नोव्हेंबर) घेतलेल्या अंतिम मुलाखतीनंतर त्यांची निवड केली. सायंकाळी राजभवनाकडून विद्यापीठाला अधिकृत मेल पाठवून नियुक्तीची घोषणा करण्यात आली.