esakal | कोरोनाच्या लाटेत विद्यापीठाचा ऑनलाइन परीक्षांचा अट्टहास

बोलून बातमी शोधा

online exam 1
कोरोनाच्या लाटेत विद्यापीठाचा ऑनलाइन परीक्षांचा अट्टहास
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या (corona) प्रादुर्भावाने थैमान घातले असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने (RTM nagpur university) पाच ते २० मे दरम्यान ऑनलाइन परीक्षांचा (online exam) अट्टहास धरला आहे. या परीक्षा महाविद्यालय स्तरावर ऑनलाइन पद्धतीने असल्या तरी प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना स्वत: किंवा आप्तेष्टांना कोरोनाने ग्रासल्याने परीक्षा घ्यायच्या कुणी असा सवाल पडला आहे. (nagpur university force to colleges to take online exam even in corona situation)

हेही वाचा: सायबर गुन्हेगाराच्या घशातून पैसे आणले परत; नागपूर सायबर पोलिसांची कामगिरी

विद्यापीठाच्या पदव्युत्तर एम.ए., एम.एसस्सी. आणि एम.कॉम.च्या प्रथम सत्राच्या परीक्षा ५ ते २० मे दरम्यान महाविद्यालय स्तरावर घ्याव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार महाविद्यालयांनी परीक्षांची आखणीही केली आहे. भयावह परिस्थितीमध्ये परीक्षा कशा घ्यायचा असा प्रश्न महाविद्यालयांना पडला आहे. परीक्षा घ्यायच्या म्हणजे कर्मचारी, प्राध्यापकांना काम आलेच. त्यांना महाविद्यालयात यावेच लागणार आहे. अशातच अनेक कर्मचारी, प्राध्यापकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काहींच्या नातेवाइकांना कोरोना झाला आहे. अशा स्थितीमध्ये परीक्षेचे काम करावे कुणी असा सवाल महाविद्यालयांसमोर आहे. कोरोनारुग्णांच्या संख्येमध्ये होणारी वाढ लक्षात घेता विद्यापीठाने हिवाळी परीक्षांना स्थगिती दिली होती. मग विद्यापीठ आता पदव्युत्तर प्रथम सत्राच्या परीक्षा घेण्याचा हट्ट का करतो असा सवाल महाविद्यालयांकडून विचारला जात आहे.

सद्य परिस्थिती कोरोनाशी दोन हात करण्याची असताना विद्यापीठ मात्र परीक्षा घेण्यासाठी आग्रही दिसते. या काळात परीक्षा घेणे अयोग्य आहे अशी मागणी अनेकदा केली. मात्र, ती अमान्य करून परीक्षा घेतली जात आहे. आपण विद्यार्थ्यांच्या जिवाची परीक्षा घेतोय का असा प्रश्न पडतो आहे.
- डॉ. आर.जी.टाले, सचिव, प्राचार्य फोरम.