esakal | ३० रुपयांत तीन लाखांचा विमा! लाखो विद्यार्थ्यांना मिळणार लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

insurance-policy

३० रुपयांत तीन लाखांचा विमा! लाखो विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये (RTM nagpur university) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमा योजना (nagpur university insurance scheme) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून ३० रुपये शुल्क घेऊन त्यांना तीन लाखांचा विमा देण्यासंदर्भात विद्यापीठाद्वारे मंथन करण्यात येत आहे. (nagpur university will give insurance of 3 lakh to student)

हेही वाचा: 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांना अपघात सुरक्षा विमा दिला जातो. मात्र, त्यासोबत विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुरक्षा विमाही देण्यात यावा यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सदस्य विष्णू चांगदे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्याला व्यवस्थापन परिषदेद्वारे मान्यता देण्यात आली असून या विमा योजनेची चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. विष्णू चांगदे स्वत: या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीला विमा योजना कशी असेल, त्याची उपयोगिता, येणारा खर्च आणि अन्य गोष्टींचा अभ्यास ही समिती करणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विद्यापीठ प्रत्येक विद्यार्थ्याला तीन लाख रुपयांपर्यंतचा विमा देण्याची विद्यापीठाची तयारी आहे. त्यासाठी केवळ विद्यार्थ्याला ३० रुपयाचे शुल्क आकारण्याचाही विचार सुरू आहे. विम्यात विद्यार्थ्याला वैद्यकीय खर्चाच्या रूपात आर्थिक मदत मिळेल. तसेच, अपघात किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबास आर्थिक मदत मिळेल. एका विशेष तरतुदीनुसार जर विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील मुख्य कमावत्या सदस्याचा मृत्यू झाल्यास विद्यार्थी आर्थिक मदतीस पात्र ठरेल, यावरही विचार सुरू आहे. उल्लेखनीय आहे की विद्यार्थ्यांच्या विम्याची सुविधा राज्यातील बहुतेक सर्व विद्यापीठांमध्ये लागू आहे. नागपूर विद्यापीठातच अशी सुविधा नव्हती. अशा परिस्थितीत, सन २०१९ पासूनच विद्यार्थी विम्याची मागणी विविध विभागांकडून केली जात होती. यापूर्वी विद्यापीठाने विमा कंपन्यांकडून ‘कोटेशन' मागविले होते, परंतु, विद्यापीठाला त्यासंदर्भातील अटी व तरतुदी न आवडल्याने निर्णय होऊ शकला नाही. यानंतर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने विविध विद्यापीठांच्या विमा पॉलिसीचा अभ्यास करून शिफारशी तयार केल्या आहेत. विद्यापीठाने अद्याप कंपनीची निवड केलेली नाही. परंतु, समितीकडून काही पर्यायांवर विचार केला जात आहे हे विशेष.

विद्यापीठस्तरावर प्रकरणांचा निपटारा -

विमा पॉलिसीचा निपटारा करण्यासाठी विद्यापीठ एक विशेष व्यवस्था करणार आहे. ही विमा प्रणाली केंद्रीय प्रणाली राहणार असून विम्याचे सर्व दावे विद्यापीठातूनच निकाली काढले जातील. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे दावे विद्यापीठाकडे पाठवावे लागतील. प्राथमिक तपासणीनंतर हे विद्यापीठ विमा कंपनीकडे पाठविण्यात येईल. हक्काची रक्कम मिळाल्यानंतर विद्यापीठ ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करेल. यात महाविद्यालयाची कोणतीही भूमिका असणार नाही. विद्यापीठ लवकरच या दिशेने अंतिम निर्णय घेणार आहे.

  • पुणे विद्यापीठ - २२ रुपये - १ लाख

  • एसएनडीटी - ७ रुपये - ५० हजार

  • अमरावती विद्यापीठ - १० रुपये - १ लाख

loading image