विद्यापीठ देईल विद्यार्थ्यांना कर्ज, कोणत्या विद्यापीठाने घेतला हा निर्णय...

Nagpur University will provide loans to needy students
Nagpur University will provide loans to needy students
Updated on

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालये व पदव्युत्तर शैक्षणिक विभागात शिक्षण घेत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने "विद्यार्थी कर्ज' योजना सुरू केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्याधन कर्ज योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या एकूण शैक्षणिक खर्चापैकी 70 टक्के रक्‍कम कर्ज म्हणून देण्यात येईल. 

गरजू विद्यार्थी दरवर्षी पाच सप्टेंबरपर्यंत महाविद्यालय किंवा विभागात अर्ज दाखल करू शकतात. योजनेचे नोडल अधिकारी म्हणून प्रत्येक महाविद्यालयीन स्तरावरील वरिष्ठ प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार आहे. विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालकांना नोडल अधिकारी करण्यात आले आहेत. उल्लेखनीय आहे की, नागपूर विद्यापीठाने नुकतीच या निर्णयाची अंमलबजावणी केली. 

विद्यार्थ्यांला हे कर्ज एका शैक्षणिक वर्षासाठी मिळेल. प्रत्येक वर्षाच्या हप्त्यापूर्वी नागपूर विद्यापीठाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्‍यक राहणार आहे. त्याचप्रमाणे जर विद्यार्थी अभ्यासक्रम संपण्यापूर्वी आधीच कर्जाची रक्कम चुकविणार असतील तर विद्यापीठालाही त्याची माहिती द्यावी लागेल. येथे बॅंकांसाठी काही नियमही ठरविण्यात आले आहेत. बॅंका विद्यार्थ्यांना रोख स्वरुपात कर्जाची रक्कम देऊ शकणार नाहीत, त्यांना फी थेट विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाला द्यावी लागेल. जर बॅंकेच्या कर्जाचा व्याज दर अकरा टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तर हे व्याज विद्यापीठाद्वारे दिले जाईल. अकरा टक्केपेक्षा जास्त असल्यास विद्यार्थ्यालाही व्याजाचा काही भाग द्यावा लागणार आहे. 

शिक्षण वर्गाकडून मागणी

विद्यापीठात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात जवळपास पाचशे महाविद्यालये संलग्न आहेत. जिथे सुमारे चार लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांची स्थिती कमकुवत आहे. इतक्‍या दिवसात त्यांच्यासाठी विद्यार्थी कर्ज सुविधा सुरू करण्याची मागणी शिक्षण वर्गाकडून केली जात होती. अखेर विद्यापीठाने त्यास मान्यता दिली. 

हे ठरणार अपात्र

प्रथमच विद्यार्थ्यांसाठी कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अभय मुदगल, विधीसभा सदस्य ऍड. मनोहन वाजपेयी, विष्णू चांगदे आणि विद्यापीठ वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी योजनेची रूपरेषा आखली आहे. या योजनेत आधीच प्रवेश घेतलेल्या शिष्यवृत्तीधारक, प्रवेश रद्द करणे, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पात्र मानले जाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com