

Nagpur University Exam
sakal
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे यंदा परीक्षेला दीड महिना उशीराने सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर निकाल लवकरात लवकर लावणे अपेक्षित होते. असे असतानाही अद्याप एकाही निकालाची घोषणा झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. त्यामुळे एकवेळ सुपरफास्ट निकाल देणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची गती एकदा पुन्हा मंदावली आहे.