
नागपूर : जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभागाने सरपंच भवन येथे आयोजित केलेली लॉटरी प्रक्रिया सुशिक्षित बेरोजगारांच्या संतापाच्या झटक्यात कोलमडली. फक्त ३५ कामेच लॉटरीसाठी दिली गेल्याने सुमारे ३०० बेरोजगारांनी तीव्र आक्षेप घेत लॉटरी प्रक्रिया थांबवली. याविरोधात नारेबाजी करीत प्रशासनाचा निषेध केला.