वादळी पावसात आडोसा घेण्यासाठी थांबला युवक, डीपीचा शॉक लागल्याने झाला मृत्यू

नागपुर शहरात दुपारी अडीच नंतर सुमारे अर्धा तास सोसाट्याचा वाऱ्यासह पावसासह गारांनी अक्षरशा शहराला झोडपून काढले. त्यामुळे अनेक भागात झाडे कोसळली.
Nagpur
NagpurEsakal
Updated on

Boy Died in Unseasonal Rain: उन्हाचा पारा ३८ अंशाच्यावर गेला असताना शनिवारी हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार वातावरणात बदल झाला. शहरात दुपारी अडीच नंतर सुमारे अर्धा तास सोसाट्याचा वाऱ्यासह पावसासह गारांनी अक्षरशा शहराला झोडपून काढले. त्यामुळे अनेक भागात झाडे कोसळली.

काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले. एका भागात तर घरावरील सोलरचा सेटही हवेने उडत रस्त्यावर पडला. यामुळे घबराट पसरली. मनपाच्या अग्निशमन विभागाकडे १७ ठिकाणी झाडे पडल्याची नोंद करण्यात आली. तर, एका घराचे छत कोसळले. वीज व केबलच्या ताराही रस्त्यांवर पडलेल्या होत्या. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर झाडांच्या फांद्या व पालापाचोळा पसरला होता. मात्र वातावरण अल्हाददायक झाले होते. सोसाटयाचा वारा सुटल्याने शनिवारी रस्त्यावरील धूळ उडाली आणि पाला पाचोळाही उडाला.

वाऱ्याने झाडांची पाने गळून व फांद्या तुटून रस्त्यांवर पसरल्या. अचानक आलेल्या पावसमुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली. उत्तर, पश्चिम, दक्षिणसह अनेक भागात एकसारखे वातावरण होते. उत्तर नागपुरात तर अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. सिव्हिल लाईन्स, सदर, छावणी, मानकापूर, टाकळी, मेकोसाबाग, यशोधरानगर, इंदोरा भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरातील अनेक भागात झाडे पडली.(Latest Marathi News)

घराची भिंत कोसळली, पश्‍चिमलाही फटका

केवळ वाराच नव्हे तर गारपिटीचा अनुभवही अनेकांनी घेतला. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गारपीट झाल्याचे पुढे आले असतानाच पश्चिम नागपुरातील अंबाझरी, रामदासपेठ, दीक्षाभूमी परिसरासह उत्तर नागपुरातील यशोधरानगर परिसरात गाराही पडल्या. उत्तर नागपुरातील प्रभाग क्र. ९ येथील गोवा कॉलनीतील झाड घराच्या छतावर कोसळले. यामुळे घराची भिंत पडली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

Nagpur
Virat Kohli: लेकाच्या जन्मानंतर विराट भारतात परतला; IPL साठी RCB संघात कधी होणार सामील?

डीपीचा शॉक लागून युवकाचा मृत्यू

लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंगाजमुना परिसरात पाऊस पडत असताना आडोसा घेतलेल्या डीपीला चिकटल्याने३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. समीर आमिर शेख (रा. वरुड.,अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी तो मित्राच्या कारने नागपूरला आला होता. दरम्यान दुपारी तो गंगाजमुना परिसरात आला असताना अचानक वादळ सुरू झाल्याने त्याने डीपी जवळ आडोसा घेतला. पावसामुळे त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना पोलिसांना माहिती पडताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले.

रस्‍त्‍यांवर वृक्ष कोसळले

-चांभार नाला अशोक चौक, तहसील कार्यालयात, आकाशवाणी कार्यालयाच्या शेजारी, महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, मेकोसाबाग, ख्रिश्चन कॉलनी, कावळापेठ रामसुमेर बाबानगर, सिव्हिल लाईन्स येथील हेंद्राबाद हाऊसवरील रस्त्यावर, देवगिरी येथे,नंदनवन साईबाबा मंदिर कवेलू क्वॉर्टर येथे,-डीफ्टी सिग्नल शितला माता मंदिराजवळ इलेक्ट्रीक केबलवर झाड पडले. यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळित झाली होती. (Latest Marathi News)

वादळाने उडविली त्रेधातिरपीट

-मानकापूर चौक पेट्रोल पंप, पाचपावली गोळीबार चौक उड्डाणपूल, नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. मध्ये २ घरावर झाड पडले

-अंबाझरी व यशोधरानगर येथे गारा पडल्या

-गोवा कॉलनीत घरावर झाड पडल्याने छत कोसळले

-राणी दुर्गावतीनगर ते इतवारी उड्डाणपुलावर उडून आलेला सोलर सेट कोसळला

Nagpur
Arvind Kejriwal : CM अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ? कथित दारू घोटाळा प्रकरणी ईडीकडून नवव्यांदा समन्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com