
नागपूर : नागपूर शहराला सामाजिक सौहार्दाचा इतिहास आहे. इथे सर्व धर्माचे अनुयायी वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. नागपूरमध्ये काल उद्भवलेल्या दोन गटातील तणावाच्या पार्श्वभूमीवरही नागरिकांनी सौहार्द्र आणि शांतता पाळावी, असे आवाहन फेडरेशन ऑफ आर्गनायझेशन्स फॉर सोशल जस्टिस, सेक्युलॅरिझम ॲण्ड डेमोक्रसीच्या सदस्यांनी ‘सकाळ संवाद’मध्ये केले.