

Nagpur
esakal
नागपूर: यूएसडीटी (युएसडीटी) आणि क्रिप्टोकरन्सी स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून नागपुरातील एका व्यक्तीची १७ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगालमधील तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने अटक केली. न्यायालयाने आरोपीला १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.