

Nagpur News
esakal
नागपूर: उपराजधानीची हवा दूषित होण्यामागे वाहनांचे मोठे योगदान आहे. शहरातील एकूण प्रदूषणापैकी सुमारे ४७ टक्के प्रदूषण वाहनांमधून होत असल्याचे संशोधनातून उघडकीस आले आहे. यामध्ये जड वाहने, शासकीय वाहने, पर्यटन वाहनासह खासगी वाहनांचा समावेश असल्याचाही उल्लेख त्यामध्ये करण्यात आला आहे.