

Nagpur
esakal
नागपूर: जंगलात हळूहळू दिवस मावळू लागला होता. वेळ कमी होता आणि समोर होते मानवी बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे आव्हान. पारंपारिक पद्धतीने मचान बांधायला वेळ नव्हता. अशावेळी वनविभागाच्या इतिहासात कधीही न घडलेला धाडसी निर्णय घेतला गेला. तो होता वाघाला चकवण्यासाठी स्वतःच पिंजऱ्यात कैद होण्याचा आणि तो यशस्वी झाला. वेलतूरच्या जंगलात हा थरारक प्रकार घडला.