

Winter Session
sakal
नागपूर : अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नेते, अधिकारी, कर्मचारी आले आहेत. त्या-त्या पक्षांच्या कार्यालयात नेते, आमदार, पक्ष कार्यकर्त्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आली आहे. असे असतानाही विधान भवन परिसरात असलेल्या खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर खवैय्यांची गर्दी होताना दिसते. इथल्या सावजी जेवणाला विदर्भाबाहेरून आलेल्या मंडळींची पसंती मिळत असल्याचे दिसते.