Curfew Imposed in Several Areas in Nagpur : सोमवारी रात्री मध्य नागपुरातील महाल परिसरात दोन गटात दंगल पेटली होती. त्यानंतर आता नागपूरमधील तणावपूर्ण शांतता असून या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करत आतापर्यंत ८० जणांना अटक केली आहे. याशिवाय सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवरही पोलिसांची नजर आहे.