

Nagpur Violence: नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक आणि वाहन पेटवून देऊन दंगल घडवण्याचा प्रकार घडला आहे. जाणीवपूर्वक ही दंगल घडवण्यात आल्याचं तिथल्या एकूण परिस्थितीवरुन समोर येत आहे. परप्रांतातील आलेल्या काही लोकांद्वारे ही नियोजनबद्ध पद्धतीनं दंगल घडवून आणल्याचा संशय त्यानिमित्त बळावला आहे. स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी देखील ही दंगल घडवून आणल्याचा आरोप केला आहे.