esakal | Nagpur : एनआयआरएफ रॅंकींगमध्ये व्हीएनआयटी विदर्भात अव्वल
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : एनआयआरएफ रॅंकींगमध्ये व्हीएनआयटी विदर्भात अव्वल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय इंस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)द्वारे गुरूवारी महाविद्यालयांचे मानांकन घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेने ३० वे स्थान पटकावून विदर्भात अव्वल येण्याचा मान पटकाविला आहे. याशिवाय त्यापाठोपाठ रॅंकींगमध्ये कामठी येथील किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीने ४६ वे स्थान मिळाले आहे. याशिवाय शहरातील नामांकित शासकीय विज्ञान संस्थेला ६१ वे स्थान मिळाले आहे.

दरवर्षी राष्ट्रीय इंस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ)द्वारे विविध श्रेंणींमधील महाविद्यालयांचे रॅंकींग घोषीत करण्यात येते. यामध्ये अभियांत्रिकी श्रेणीमध्ये ५४.९४ गुणांसह व्हीएनआयटीने ३० वे स्थान पटकाविले. गेल्या वर्षीच्या तुलनेत संस्थी दोन स्थान मागे आली असली तरी संस्थेच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी संस्थेला २८ वे स्थान मिळाले होते. संस्थेला आर्किटेक्चर श्रेणीत ५३.९३ गुणासह १७ वे स्थान मिळाले आहे. फार्मसीमध्ये ४४.९१ गुणासह कामठी येथील किशोरीताई भोयर कॉलेजने ४६ वे स्थान पटकाविले आहे.

गेल्यावर्षीच्या संस्थेला ४२.६२ गुणासह ४८ वे स्थान मिळाले होते. याशिवाय शहरातील नामांकित शासकीय विज्ञान संस्थेला ५३.९३ गुणांसह ६१ वे स्थान मिळाले आहे. याशिवाय शहरातील शासकीय न्यायसहाय्य वैद्यक संस्थेला ५१.३४ गुणांसह ८८ वे स्थान मिळाले आहे. याशिवाय शहरातील प्रतिष्ठित आयआयएम नागपूरला गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ५०.६२ गुणासह व्यवस्थापन श्रेणीत ४० वे स्थान मिळाले आहे.

हेही वाचा: कॅन्सर इन्स्टिट्यूटचा मार्ग मोकळा

अभियांत्रिकी महाविद्यालयांची कामगिरी

रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला ३७.२२ गुणांसह अभियांत्रिकी श्रेणीमध्ये ११९ वा क्रमांक मिळाला आहे. याशिवाय शहरातील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय ३६.४६ गुणांसह १३० वे स्थान, विद्यापीठातील लक्ष्मीनारायण तंत्रज्ञान संस्थेला ३५.९५ गुणांसह १३६ वे स्थान तर यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय ३५.२८ गुणांसह १४९ वे स्थान मिळाले आहे. याशिवाय वैद्यकीय श्रेणीत वर्धा येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसला ५१.५२ गुणांसह वैद्यकीय श्रेणीमध्ये ३४ व्या क्रमांकावर आहे. ५८.३८ गुणांसह संस्था डेंटल श्रेणीमध्ये १९ व्या स्थानावर आहे.

नागपूर विद्यापीठाची कामगिरी निराशाजनकच

मध्य भारतातील सर्वात मोठे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला गेल्या वर्षीप्रमाणे ‘विद्यापीठ’ श्रेणीमध्ये सर्वात कमी मानांकन मिळाले आहे. नागपूर विद्यापीठाला २०० विद्यापीठांच्या यादीत १५१ ते २०० च्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. कुठलाही रँक देण्यात आलेले नाही. गेल्या वर्षीही परिस्थिती तशीच होती. आता एकीकडे ‘नॅक'' ने विद्यापीठाला ‘अ‘ दर्जा दिला आहे, तर दुसरीकडे एनआयआरएफ रॅंकींगमधील सर्वात मागास संस्थांमध्ये मोजण्याचे कलंकही विद्यापीठावर लागला आहे.

loading image
go to top