Nagpur Wadi Witness Attack : साक्षीदारावर प्राणघातक हल्ला वाडीतील घटना ; हद्दपार गुन्हेगाराला अटक

Sagar Chandravat Arrested by Wadi Police : न्यायालयात विरोधात साक्ष दिल्याच्या कारणावरून सागर चंद्रवत याने सचिन बुरहाणी यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना वाडीतील टी पॉइंटजवळ घडली.
Nagpur Wadi Witness Attack

Nagpur Wadi Witness Attack

esakal

Updated on: 

नागपूर : न्यायालयात विरोधात साक्ष दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या हद्दपार गुन्हेगाराने चाकूने हल्ला करीत तेलमालिशचे काम करणाऱ्या व्यक्तीला गंभार जखमी केले. ही घटना वाडी हद्दीतील टी पॉइंटजवळ रविवारी (ता. २७) दुपारी घडली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सचिन दीपक बुरहाणी (वय ४५, रा. खापरी केणे, पारडसिंगा, नरखेड) असे जखमीचे, तर सागर जगदीप चंद्रवत (वय २४, रा. नरखेड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सागरविरुद्ध हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात सचिन यांनी साक्ष दिली होती. त्यावरून दोघांमध्ये वाद होता. याप्रकरणानंतर सागरला हद्दपार करण्यात आले होते.

Nagpur Wadi Witness Attack
Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

सचिन यांचा तेलमालिशचा व्यवसाय आहे. कामानिमित्त ते दर रविवारी वाडी परिसरात बालाजी आयुर्वेदिक औषधी दुकानात यायचे. याबाबत सागरला पुरेपूर माहिती होती.

त्याने सचिन यांच्यावर हल्ल्याची योजना आखली. सचिन औषधीच्या दुकानाजवळ येताच आरोपीने त्यांच्या पाठीवर चाकूने तीन वार करीत गंभीर जखमी केले. सचिन यांच्यावर मेयोत उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, काही वेळात लोकेशनच्या आधारे आरोपीला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com