Gyanesh Kumar Resignation Letter : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याचे पत्र व्हायरल; निवडणूक आयोगाने सांगितले सत्य

Election Commission : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राजीनामा दिल्याचे कथित पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मात्र निवडणूक आयोगाने या पत्राबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
Gyanesh Kumar Resignation Letter Goes Viral

Gyanesh Kumar Resignation Letter Goes Viral

esakal

Updated on: 

Gyanesh Kumar Resignation Letter Goes Viral : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान, एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. कुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केल्याचा दावा यात केला जात आहे. मात्र, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि व्हायरल झालेले पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेबाबत आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच ही घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com