Nagpur Car Accident : कार नाल्यात पडून विवाहितेचा मृत्यू वर्धा मार्गावरील घटना; पतीसह पाच वर्षीय मुलगा जखमी

Car Overturns Into Drain Near Rani Kothi : वर्धा मार्गावरील राणी कोठीजवळ कार नाल्यात उलटल्याने ३१ वर्षीय सारिका नीलेश मनवानी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Nagpur Car Accident

Nagpur Car Accident

esakal

Updated on: 

नागपूर : वर्धा मार्गावरील राणी कोठीजवळ भरधाव कार नाल्यात उलटल्याने झालेल्या अपघातात ३१ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला. याशिवाय पती आणि पाच वर्षीय मुलगा जखमी झाला. सारिका नीलेश मनवानी (वय ३१, रा. बेलतरोडी) असे मृत विवाहितेचे नाव असून पती नीलेश आणि अभीर असे जखमी मुलाचे आहे.

माहितीनुसार, सारिका यांचे माहेर अमरावती जिल्ह्यातील यावली येथे आहे. गणपती विसर्जनासाठी त्या पती नीलेश आणि मुलासह २७ सप्टेंबरला अमरावती येथे आल्या होत्या. २८ सप्टेंबरला रात्री आठच्या सुमारास ते एमएच ४९ सीडी ८८७५ क्रमांकाच्या कारने नागपूरकडे परत निघाले.

कार नीलेश चालवत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास राणी कोठीजवळ कार भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार नाल्यात उलटली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सारिका यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नीलेश यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. बेलतरोडी पोलिसांनी नीलेश मनवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक किशोर मालोकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com