
नागपूर : फ्लाय ॲशमुळे अनेक भागात पाणीपुरवठा बंदच
नागपूर - नदीतील फ्लाय ॲशमुळे कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील सातपैकी चार पंप अजूनही बंद असल्याने पाच दिवसानंतरही काही भागात पाणीपुरवठा सुरू झाला नाही. परिणामी संततधार पावसातही अनेक भागातील नागरिकांना पाण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागत आहे. नळांना पाणी कधी येणार, असा प्रश्न पाणीपुरवठा सुरू न झालेल्या वस्त्यांतील नागरिकांना पडला आहे.
कन्हान नदीमध्ये १५ जुलै रोजी खापरखेडा औष्णिक केंद्राची फ्लाय ॲश पुन्हा आढळून आल्याने असून कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातील सातही पंप बंद करण्यात आले होते. आशीनगर, नेहरूनगर, सतरंजीपुरा, लकडगंज झोनमधील २८ जलकुंभांतर्गत वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा बंद होता. यातील काही वस्त्यांमध्ये दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरू झाला. परंतु उत्तर नागपुरातील बुद्धनगर, मॉडेल टाऊन व इतर भागांमध्ये अद्यापही पाणीपुरवठा बंद आहे. कन्हान नदीमध्ये अजूनही फ्लॉय ॲश कायम असल्याचे सुत्राने नमुद केले.
त्यामुळे अद्यापही सातपैकी चार पंप बंद आहेत. केवळ तीन पंप सुरू करण्यात आल्याने काही भागातील नागरिकांना दिलासा मिळाला. सद्यस्थितीत कन्हान नदीतून १६५ ते १७० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. अर्थात २८ जलकुंभांतर्गत वस्त्यांपैकी ७० टक्के भागात नळ सुरू झाले. परंतु ३० टक्के परिसर अद्यापही नळातून पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
दोन दिवसांत नियमित पाणीपुरवठा
आज पावसाने उसंत दिली. उद्याही अशीच स्थिती कायम राहिल्यास फ्लाय ॲशचा प्रभाव कमी होईल. त्यानंतर बंद असलेले चारही पंप सुरू करणे शक्य होणार आहे. दोन दिवसांत नियमित पाणीपुरवठा होईल, असे एका अधिकाऱ्याने नमुद केले.
Web Title: Nagpur Water Supply Stopped Due To Water Treatment Plant For Pump Closed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..