
नागपूर : गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर उपराजधानीत आज अपेक्षेप्रमाणे पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सकाळी व दुपारी बरसलेल्या संततधार पावसाने एकीकडे नागपूरकर सुखावले, मात्र त्याचवेळी वाहनधारकांना त्रासही खूप झाला. शहरात गेल्या दोन दिवसांत तब्बल १०२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात आणखी तीन-चार दिवस जोरदार पाऊस राहणार आहे.
पहिल्या आठवड्यात चार-पाच दिवस पाऊस पडल्यानंतर दोन दिवस उघडीप दिली. त्यानंतर वरुणराजा पुन्हा विदर्भात सक्रीय झाला आहे. शुक्रवारी सकाळीपासूनच पावसाला सुरवात झाली. काही भागांत मेघगर्जनेसह बरसल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा तासभर विजांच्या कडकडाटांसह जोरदार सरी आल्या.
दोन दिवसांच्या पावसामुळे सखल भागांत जागोजागी पाणी तुंबले असून, वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे आजही शहरातील दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले होते.
प्रादेशिक हवामान विभागातर्फे शहरात दोन दिवसांमध्ये १०२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भातील चंद्रपूर (८८.८ मिलिमीटर), अकोला (५३.६ मिलिमीटर), वर्धा (४६.२ मिलिमीटर) आणि यवतमाळ (२५ मिलिमीटर) जिल्ह्यातही दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. हवामान विभागाचा यलो व ऑरेंज अलर्ट असल्यामुळे विदर्भात पुढील तीन-चार दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. चंद्रपूर व यवतमाळसह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.