ज्याची भीती तेच पुढ्यात! मायलेकाला ओमिक्रॉनची बाधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 children corona
ज्याची भीती तेच पुढ्यात! मायलेकाला ओमिक्रॉनची बाधा

नागपूर : ज्याची भीती तेच पुढ्यात! मायलेकाला ओमिक्रॉनची बाधा

नागपूर : सध्या वाढत असलेल्या ओमिक्रॉन (Omicron) धोक्यामुळे उपराजधानी हादरली आहे. सोमवारी चार ओमिक्रॉनबाधितांची (Omicron Interrupted) नोंद झाल्यानंतर लगेच मंगळवारी (ता.४) आणखी तीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे तर १९६ कोरोनाचे रुग्ण (Corona patient) आढळले. दोन दिवसांत ७ जण बाधित झाले. दोन दिवसांपुर्वी सहा वर्षाचा चिमुकला ओमिक्रॉनबाधितआढळला होता. त्या चिमुकल्याची आई ओमिक्रॉनबाधित आढळली. यामुळे त्यांच्या संपर्कातील शेकडो लोकांना ओमिक्रॉन संक्रमणाचा धोका आहे. कोरोनाच्या साथीने ओमिक्रॉन वाढत असल्याने उपरजाधानीवरील ओमिक्रॉनसह कोरोनाचे संकट अधिक गडद झाले आहे.

हेही वाचा: मणिपूरच्या दारात दिल्ली आली : मोदी

शारजातून परतेली व्यक्ती कोरोनाबाधित

मंगळवारी (ता.४) झालेल्या ७ हजार ८ चाचण्यांमध्ये १९६ कोरोनाबाधित आढळले. यात शारजाहून परतलेली ४४ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळली आहे. १९६ बाधितांमध्ये १६६ शहरातील आहेत. तर उर्वरित २४ जण ग्रामीण भागातील तर ६ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत. शारजातून येणाऱ्यांमध्ये ओमिक्रॉनचे व्हेरिएंट आढळून येत असल्याची बाब चिंता वाढवणारी आहे. आज जिल्ह्यात ६९६ कोरोनाबाधित आहेत. यात शहरातील ५९६ तर ७७ ग्रामीण भागातील उर्वरित २३ जण जिल्ह्याबाहेरचे आहेत.

हेही वाचा: सिंधूताई सपकाळ : आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ओमिक्रॉनावर ६ जणांची मात

जिल्ह्यात पहिला ओमिक्रॉनबाधित रुग्ण १२ डिसेंबरला आढळून आला. यानंतर सातत्याने ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले. सोमवारी ४ आणि मंगळवारी ३ असे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली. हे सर्व ओमिक्रॉनबाधित एम्समध्ये दाखल होते. १३ पैकी ६ ओमिक्रॉनबाधितांनी मात केली आहे. सद्या एम्समध्ये ७ जण दाखल असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top