मणिपूरच्या दारात दिल्ली आली : मोदी | Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi
मणिपूरच्या दारात दिल्ली आली : मोदी

मणिपूरच्या दारात दिल्ली आली : मोदी

इम्फाळ : ईशान्य भारत (Northeast India) देशाच्या प्रगतीचा चालक बनेल, अशा विश्वास व्यक्त करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज मणिपूरमध्ये (Manipur) निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. पंतप्रधानांच्या हस्ते आज तेरा प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले तर अन्य नऊ प्रकल्पांची पायाभरणी पार पडली. या प्रकल्पांमुळे लोकांचे जीवनमान उंचावेल असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.

पंतप्रधानांचे आज विशेष विमानाने इम्फाळमध्ये आगमन झाले. सर्वप्रथम त्यांनी गोविंदाजी मंदिराला भेट देत तिथे पूजाअर्चा केली. मोदी म्हणाले की, ‘‘याआधीचे मुख्यमंत्री, मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्यासाठी दिल्लीला जावे लागत असे पण हा आता भूतकाळ झाला आहे. ईशान्य भारताचा समतोल विकास झाल्याशिवाय देशाची योग्य पद्धतीने प्रगती होणार नाही असे केंद्रीय नेतृत्वाला वाटते. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच मी दिल्लीला मणिपूरच्या आणि ईशान्य भारताच्या दारामध्ये आणले. आता हा सगळा प्रदेश देशाच्या प्रगतीचा चालक बनेल.’’

हेही वाचा: इंदापूर : छत्रपती कारखान्याचे ५ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप

त्रिपुरात डाव्या राजवटीवर टीका

आगरतळा ः त्रिपुरामध्येही पंतप्रधानांनी आज प्रचारसभा घेत मागील डाव्या आघाडीच्या सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील याआधीच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकाळामध्ये मोठ्याप्रमाणावर भ्रष्टाचार वाढला होता पण भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार हे या राज्याचा ईशान्येचा प्रवेशद्वार म्हणून विकास घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांच्या हस्ते आज येथील महाराजा वीर विक्रम विमानतळावर उभारण्यात आलेल्या नव्या टर्मिनलचे उद्‍घाटन करण्यात आले, त्यानंतर आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले

  • मागील सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला

  • त्रिपुराच्या लोकांकडे अनेक दशके दुर्लक्ष झाले

  • भाजपने ‘हिरा’ मॉडेलच्या माध्यमातून विकास केला

  • त्रिपुरा ईशान्येकडील व्यापाराचे केंद्र बनले आहे

  • रेल्वे आणि रस्त्यामुळे राज्याचा चेहरा बदलला

  • बिरेन सरकारच्या प्रकल्पांचे कौतुक

हेही वाचा: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून कोरोना नियमांची शहरात पायमल्ली

बिरेन सरकारने सुरू केलेल्या ‘खेड्याकडे चला’ आणि ‘टेकड्यांवर चला’ या प्रकल्पांचे पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केले. ‘हिल टू व्हॅली’ या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर पर्यटनाला चालना दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. ऑलिंपिक आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या स्थानिक तरुणींचे देखील मोदींनी कौतुक केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top