Nagpur Crime NewsEsakal
नागपूर
Nagpur : आसिफच्या प्रेमात वेडी, दीक्षानं पतीला संपवलं; आजारपणामुळे मृत्यूचा बनाव पोस्टमार्टम रिपोर्टने उघड, दोघांना अटक
Nagpur Crime News : एका महिलेनं तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. पतीला गंभीर आजार होता. त्याच्या हत्येनंतर महिलेनं आजारपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानं पत्नीने पतीची हत्या केलीय. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. एका महिलेनं तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली. पतीला गंभीर आजार होता. त्याच्या हत्येनंतर महिलेनं पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र चौकशीत तिनं पोलिसांसमोर गुन्हा मान्य केला.