

Nagpur Winter Session
sakal
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. यासाठी मुंबईहून संपूर्ण सचिवालय नागपुरात डेरेदाखल झाले असून, अधिवेशनाशी संबंधित कामेही अंतिम टप्प्यात आली आहे. या अधिवेशनात दोन्ही सभागृहात ११ विधेयक सादर होणार आहेत. यापैकी सहा अध्यादेश तर पाच नवीन विधेयक राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.