
नागपूर : परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि त्यानंतर पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांवर केलेला लाठीहल्ला, बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध, मारकडवाडीतील नागरिकांचे ईव्हीएम विरोधातील आंदोलन दडपण्यासाठी दाखल केलेले गुन्हे आदींवरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याची टीका करत विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला.