

Nagpur Winter Session
sakal
तुषार पिल्लेवान
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ८ डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनासाठी सुमारे १२०० वर वाहनांची आवश्यकता भासणार आहे. दरवर्षीच वाहनांची तजवीज करताना प्रशासनाला घाम फुटतो. यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. याच काळात जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यास वाहनांची जुळवाजुळव करणे प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.