

Youth Protest Nagpur
esakal
नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्य योजनेच्या प्रशिक्षणार्थी तरुणांनी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन केले. चार दिवसांपूर्वी या तरुणांनी यशवंत स्टेडियमबाहेर चॉकलेट वाटपाचे अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आज दुसऱ्यांदा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला पोलिसांनी रोखले आणि परिस्थिती चिघळली.