
Nagpur Weather
sakal
नागपूर : तीन दिवसांपूर्वी विजांसह धो-धो बरसल्यानंतर रविवारी पुन्हा शहरात मेघगर्जना पाहायला मिळाल्या. मात्र यावेळी पाऊस कमी आणि गडगडाटच अधिक झाल्याने नागपूरकरांची काहीशी निराशा झाली. प्रादेशिक हवामान विभागाचा आणखी तीन-चार दिवस यलो अलर्ट असल्यामुळे पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.