
नागपूर : श्रावण महिना म्हटला की हमखास सरींवर सरी बरसतात. असाच काहीसा अनुभव बुधवारी नागपूरकरांना आला. शहरात पहाटेपासून दुपारी व सायंकाळपर्यंत दिवसभर सरींवर सरी कोसळल्या. तापमान घसरल्याने वातावरणात गारवा निर्माण होऊन उपराजधानीला अक्षरशः ‘हिलस्टेशन’चा फिल आला होता. पावसामुळे काहींना मनःस्ताप सहन करावा लागला; मात्र बहुतेकांनी या आल्हाददायक वातावरणाचा आनंदच घेतला.