नागपूर : महिला कॉन्स्टेबलची गळफास घेवून आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sucide

नागपूर : महिला कॉन्स्टेबलची गळफास घेवून आत्महत्या

नागपूर ः हुडकेश्वर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या व त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिला पोलिस कॉन्स्टेबलने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. अश्विनी धनंजय खंडागळे, (वय ३०) रा.बोरकर ले-आऊट, पिपळा फाटा असे महिला पोलिसाचे नाव आहे.

अश्विनी २०१४ मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात सामील झाली होती. सध्या ती हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तैनात होती. अश्विनीचा विवाह २०१८ मध्ये बीएसएफ, बिहारमध्ये तैनात धनंजय खंडागळे यांच्याशी झाला होता. घटनेच्या २० दिवस आधी रजा संपवून धनंजय परत ड्युटीवर गेला होता. त्यांना २ वर्षांची मुलगी आहे. अश्विनी येथे सासू व मुलीसह राहत होती. शेजारी अश्विनीच्या वहिनीचे घरही आहे. त्याचा दीर बारामतीत एमएसईबीमध्ये इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. तोही एक दिवसापूर्वीच बारामतीहून आला होता. गेल्या काही

दिवसांपासून त्या ड्युटीवर गैरहजर होत्या. ही घटना गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठले. दरम्यान अश्‍विनीच्या आत्महत्येमुळे पोलिस दलात खळबळ माजली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनीही मौन साधले आहे.तपासात तिच्या जवळ सुसाईड नोट आढळून न आल्याने तिने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. त्यामुळे आत्महत्याचे गुढ कायम आहे.

हेही वाचा: काँग्रेसकडून उद्या देशभरात 'किसान विजय दिवस', कार्यक्रमांचं आयोजन

नवरात्रीनंतर नव्हती ड्युटीवर

घटनेच्या दिवशी अश्विनीच्या नातेवाईकांच्या घरी तुळशीपूजा होती. यावेळी घरात सासू, वहिनी आणि तिची मुलगी या दोन्ही मुली होत्या. रात्री ९.४५ च्या सुमारास सर्वांनी अश्विनीला तुळशीपूजनासाठी येण्यास सांगितले, मात्र, ती आजारी असल्याचे सांगून घरीच थांबली. सर्वजण निघून जाताच अश्विनीने घराचा दरवाजा बंद करून खोलीतील पंख्याला दुपट्टा बांधून गळफास लावून घेतला. कुटुंबीय परत आले असता बराच वेळ दार ठोठावूनही दरवाजा उघडला नाही. अश्विनीच्या नातेवाईकाने खिडकीतून डोकावले असता अश्विनी फासावर लटकलेली दिसली. घाईघाईत दरवाजा तोडून पोलिसांना कळवण्यात आले. नवरात्रीच्या काळात कोराडी मंदिरात अश्विनीची ड्युटी लावण्यात आली होती. नवरात्रीनंतर ती ड्युटीवर नसल्याने तिच्या गैरहजेरीची पोलिस ठाण्यात सातत्याने नोंद होती.

loading image
go to top