Nagpur Accident : डोंगरगावमध्ये भरधाव ट्रकची धडक; महिला ठार
Road Accident : नागपूरमधील डोंगरगाव परिसरात भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत ३३ वर्षीय महिला शुभांगी यादव यांचा मृत्यू झाला. ट्रक चालक अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव परिसरात घडलेल्या ‘हीट अँड रन’च्या घटनेत जखमी महिला ठार झाली. शुभांगी सुनील यादव (३३ रा. पलकी, दिडोरी, मध्यप्रदेश सध्या रा. गणेशपूर टेकडी वस्ती, बुटीबोरी) असे मृताचे नाव आहे.