
नागपूरमधील एक महिला नुकतीच तिच्या १५ वर्षीय मुलासोबत कारगिलला फिरायला गेली होती. तिथं एका हॉटेलमध्ये राहिली पण तिथं मुलाला सोडून अचानक बेपत्ता झालीय. ३६ वर्षीय महिला लडाखमधील कारगिल जिल्ह्यातलं शेवटचं गाव असलेल्या हुंदरबन इथं गेली होती. तिथून ती बेपत्ता झाली असून तिचा शोध लागलेला नाही. ती गुप्तहेर होती का? या दृष्टीकोनातून तपास केला जात आहे. भारताने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतरच ती कारगिलमध्ये पोहोचली होती. त्यानंतर महिला बेपत्ता झाली आहे.