
नागपूर : नववर्षाच्या स्वगत तरुणाईने मोठ्या उत्साहात केले. यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय अनेकांना एकत्र येत घरीच किंवा शेजारी कार्यक्रम घेतले. मद्याचा घोट घेत मास-मटणावर ताव मारला. एकट्या ३१ डिसेंबरला हजारो लिटर मद्य नागपूरकरांनी रिचवले. यातून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळाला.