
Bunty Shelke Alleged NIT Corruption : नागपूर सुधार प्रन्यासमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यासंदर्भात आज युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या नेतृत्वात पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलंच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. काही कार्यकर्ते थेट एनआयटीच्या गेटवरही चढले.