Drowning Accident: नागपूरच्या द्रुगधामना परिसरात बदक पकडण्याच्या प्रयत्नात २३ वर्षीय यश सुखदेव मोहळ याचा बुडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
नागपूर : बदक पकडण्याचा प्रयत्नात २३ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता.२) दुपारी चार वाजताच्या सुमारास वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्रुगधामना येथे उघडकीस आली.