

Nagpur Zilla Parishad
sakal
नागपूर : जिल्हा परिषदेच्या वाट्याच्या ११९ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कापैकी केवळ ४१ कोटी रुपये प्राप्त झाले. उर्वरित ८७ कोटी शासनाकडे थकीत आहेत. आतापर्यंत दोन टप्प्यांत २० आणि २१ कोटी असा एकूण ४१ कोटींचा निधी मिळाला आहे. उर्वरित निधी मिळण्यात विलंब झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या विकासकामांवर थेट परिणाम होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.