नागपूरः शहरातील महाराजबाग प्राणी संग्रहालयातील वाघाच्या पिंजऱ्यात गुरुवारी सकाळी एक युवक शिरल्याने चांगलीच खळबळ उडाली. सीताबर्डी पोलिसांच्या मदतीने या युवकाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला..करण धनराज सोमकुंवर (वय २६, रा. विठ्ठल मंदिराजवळ, गड्डीगोदाम) असे या युवकाचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे कळते. महाराजबाग येथे काम करणारे प्राणिपाल हरिभाऊ तिरमले आणि त्यांचे सहकारी आज सकाळी नेहमीप्रमाणे वाघाच्या पिंजऱ्याचे कुलूप काढून आत जात असताना आतमध्ये एक युवक असल्याचे दिसले. त्यांनी प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बाविस्कर यांना माहिती दिली. .त्यानंतर लगेचच पोलिसांचा ताफा महाराजबागमध्ये दाखल झाला. त्यांनी युवकाला बाहेर येण्यास सांगितले. मात्र, युवकाने त्यांना नकार दिला. त्यानंतर किमान अर्धा तास त्याच्याशी गोड बोलून त्याला शिताफीने बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्याचा भाऊ ऋषभ सोमकुंवर यांनी दिली..१८ फूट उंच जाळीवर चढलासकाळी साडेसातच्या सुमारास सुरक्षारक्षकांची नजर चुकवून करण प्राणिसंग्रहालयात शिरला. तब्बल १८ फूट उंच असलेली सुरक्षारक्षक जाळीवर चढून तो वाघाच्या पिंजऱ्यात गेला. सकाळची वेळ असल्याने वाघ सहसा बाहेर येत नाही. तो‘नाईट शेल्टर’मध्ये बसला असल्याने अनर्थ टळला..''आजच्या प्रकाराने वाघाच्या पिंजऱ्यांची दुरुस्ती आणि ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि या परिसरात चौकीदार, बंदुकधारी सुरक्षारक्षकांच्या मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.''- डॉ. सुनील बाविस्कर, प्रभारी अधिकारी, महाराजबाग संग्रहालय.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.