ते पहा, अमेरिकेतील नागपूरकर म्हणतात, वुई आर फाईन !

न्यूयार्क येथे वास्तव्य करणारे नागपूरकर दळवी कुटूंबीय.
न्यूयार्क येथे वास्तव्य करणारे नागपूरकर दळवी कुटूंबीय.
Updated on


नागपूर  : कोरोना संक्रमणाचा अमेरिकेत सर्वाधिक उद्रेक आहे. सातासमुद्रापारच्या रहिवासी असलेल्या भारतीयांची काय स्थिती असेल, हे जाणून घेण्याचे सर्वांना कुतूहल आणि थोडी भीती, अशा संमिश्र भावना सगळ्यांच्या मनात आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क, बोस्टन, न्यूजर्सी या जास्त संसर्ग असलेल्या भागात राहणाऱ्या नागपूरकरांनी आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने सगळे नियम पाळत असून "वुई आर फाइन, तुम्हीही काळजी घ्या,' असे "सकाळ'च्या माध्यमातून कळवले आहे.

"वर्क फ्रॉम होम'ला प्राधान्य
न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असलेला आणि मूळचा हिंगणा एमआयडीसी परिसरातील बालाजीनगर येथील गौरव दिवाकर दळवी अमेरिकेच्या सरकारी खात्यात "चीफ आर्किटेक्‍ट डाटा सोल्यूशन'मध्ये नोकरी करतो. पत्नी जागृतीही "डेटा सायंटिस्ट' म्हणून वॉशिंग्टन येथे नोकरी करते. छत्रपती फाउंडेशन न्यूयॉर्क, या नावाची संस्था स्थापन करून तेथे भारतीयांच्या माध्यमातून सामाजिक कार्य त्यांनी सुरू केले आहे. सध्या अमेरिकेत "लॉकडाउन' सुरू आहे. "वर्क फ्रॉम होम'ला सरकारचे प्राधान्य असल्यामुळे दोघेही घरूनच काम करतात. न्यूर्याकमध्ये कोरोनाचे संक्रमण अधिक असल्यामुळे 15 मेपर्यंत असलेला "लॉकडाउन' वाढू शकतो, असे गौरवने सांगितले. येथे सर्व जण सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्याचे तो म्हणाला.

जे शक्‍य आहे तेच करतेय सरकार
न्यूयॉर्कमध्ये कसलाही भेदभाव नसून सर्व नागरिक सामंजस्याने व्यवहार करतात. कोरोना संकटाच्या काळात सुरवातीला चीन आणि कोरियाच्या नागरिकांविषयी कटुता असल्यामुळे काही अप्रिय घटना घडल्या. परंतु, त्यानंतर अमेरिकन जनतेने सामंजस्याची भूमिका घेतली. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्याकरिता "प्लाझ्मा' थेरपीचा येथे अधिक भर देण्यात येत आहे. या संक्रमणावर काहीच रामबाण उपचार नसल्यामुळे या आजारातून नागरिकांची सुटका व्हावी याकरिता सरकार सद्यस्थितीत जे योग्य आणि शक्‍य आहे, त्याकडे लक्ष देत आहे. त्यासाठी सहकार्य करण्यासाठी अनेक युवक पुढे येत असल्याचे गौरवने सांगितले. न्यूजर्सी येथे शिक्षण घेत असलेला गौरवचा लहान भाऊ अपार दळवी यानेही आपण सुरक्षित असल्याचे सांगितले.

तुम्हीही पाळा नियम
बोस्टन येथे वास्तव्यास असलेले डॉ. प्रफुल्ल भड हे मूळचे सावनेर तालुक्‍यातील पोटा या छोट्या खेड्यातील आहेत. सहा वर्षांपासून ते बोस्टनमध्ये एका औषध कंपनीत नोकरी करतात. पत्नी शुभदाही मोठ्या पदावर कार्यरत आहे. अमेरिकेचे सरकार कुठलाही भेदभाव न पाळता सर्वच नागरिकांना समान वागवतात. एवढ्या मोठ्या संकटाशी सामना करीत असताना सध्या अमेरिकेत भयग्रस्त वातावरण नसून यातून बाहेर कसे पडायचे, यावर सगळेच काम करताहेत. सरकारचा "सोशल डिस्टन्सिंग' आदेश असो वा "वर्क फ्रॉम होम' याचे काटेकोरपणे पालन करून राष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्याचे पुरेपूर प्रयत्न करणेच प्रत्येकाच्या हातात असल्याचे डॉ. भड सांगतात. एकंदर आम्ही "सेफ' असून तुम्हीही सुरक्षेचे नियम पाळून सुरक्षित राहा, असा मनोबल वाढविण्याचा सल्ला अमेरिकेतील भारतीय देत आहेत. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

NMC MBBS Admission
NMRDA Land Acquisition
Nagpur Police arrested two women after a 'Luteri Dulhan' gang allegedly duped a Gujarat man of ₹70,000 and gold ornaments on the pretext of marriage.
Nagpur Loan waiver
Marathi News Esakal
www.esakal.com