
नागपूर : जिल्ह्यात समाजकल्याण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या २६ निवासी शाळांमध्ये तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. ही कारवाई विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षा आणि शिक्षणाच्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. या झाडाझतीमध्ये एक निवासी शाळा बंद करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.