

Colorful kites soaring high as Nagpur residents celebrate the kite festival with music and joy.
Sakal
नागपूर: मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळपासूनच नागपूरच्या आकाशात रंगीबेरंगी पतंगांची स्पर्धा आणि काटछाट पाहायला मिळाली. इमारतींच्या छतावर ‘ओ काट... आणि लपेट चक्रीच्या घोषणांबरोबरच चक्रीच्या ‘सरर...’ आवाजाच्या सोबतीला साऊंड सिस्टिमवरील गाण्यांचा ठेका अशा उत्साही वातावरणात बुधवारी पतंगप्रेमींनी माहौल करीत पतंगोत्सव साजरा केला.