Maheshwar Dhone : नागपूरच्या तरुणाचा अमेरिकेतील स्पर्धेत डंका; महेश्वर ढोणे व संघाला जागतिक ‘एरोमॉडेलिंग शो’मध्ये द्वितीय स्थान
Aeromodelling Competition : नागपूरचा युवा एरोमॉडेलचालक महेश्वर ढोणे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कॅलिफोर्नियातील जागतिक 'एरोमॉडेलिंग शो' मध्ये द्वितीय स्थान पटकावले.
नागपूर : नागपूरचा युवा एरोमॉडेलचालक महेश्वर ढोणे व त्याच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया (लॉस एंजेलिस) येथे झालेल्या जागतिक ‘एरोमॉडेलिंग शो’मध्ये द्वितीय स्थान पटकावून उपराजधानीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.