नाल्यालाही सांभाळला नाही पुराचा लोंढा, मग त्याने होते नव्हते तेही नेले... .

 कन्हान : गोंडेगावचा नाला फुटल्यामुळे जलमग्न झालेले शेतातील पीक.
कन्हान : गोंडेगावचा नाला फुटल्यामुळे जलमग्न झालेले शेतातील पीक.
Updated on

कन्हान (जि.नागपूर) : वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान माती डम्पिंगलगत पावसाचे पाणी वाहून जाण्याला जागा न मिळाल्यामुळे नाला फुटून शेत जलमय झाले. त्यामुळे शेतपिकाचे भयंकर नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले. वेकोलि गोंडेगाव प्रशासनाने त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

#special : ज्यांच्यासाठी दिवसरात्र लढतो तेच आता करताहेत तिरस्कार, वाचा एका कोरोनाग्रस्त पोलिसाची भावना...

पिकांचे मोठे नुकसान
वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान माती डम्पिंगमुळे मोठमोठ्या कृत्रिम टेकट्या निर्माण होऊन या खदान परिसरातील पाणी वेकोलिने तयार केलेल्या नाल्यातून होत नाही. हा नाला फारच छोटा असल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडचण येते. पावसामुळे डम्पिंगची माती पाण्यासह वाहत आल्याने नाला फुटून शेतात पाणी शिरले. कपाशी, तूर, धान, भेंडी आदीचे पीक पाण्याखाली बुडून सर्व शेती जलमय झाली.

शेतकरी झाले संतप्त
शेतकरी मोरेश्वर शिंगणे, शोभा शिंगणे, निखिल शिंगणे, विष्णू लांडगे, कैलास लांडगे, संजय लांडगे, कैलास शिंगणे, अनिल छानीकरसह अनेक शेतक-यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. कृषी व तहसील कार्यालयाने या नुकसानीचा पंचनामा करून अहवाल वेकोलिला पाठविला. परंतु, अद्याप नुकसानभरपाई न दिल्याने शेतकरी संतापले आहेत. गोंडेगावचे सरपंच नीतेश राऊत व घाटरोहण्याच्या सरपंच मीनाक्षी बेहुणे यांनी वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदानव्दारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

संपादन : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur Crime
Nagpur Civic Issue
NMC MBBS Admission
NMRDA Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com