esakal | "...तर तेव्हा मोदींच्या डोळ्यांत पाणी का आलं नाही?"
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole criticized PM modi in Nagpur

मोदींच्या नौटंकीला देशातील जनता आता विसरणार नाही. दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईने जनतेचे डोळे उघडले आहेत. मोदी शेतकऱ्यांच्या भल्याच्या नुसत्या बाता करतात,

"...तर तेव्हा मोदींच्या डोळ्यांत पाणी का आलं नाही?"

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर ः महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच आज उपराजधानीत जंगी स्वागत करण्यात आलं. शहरातील नेते आणि शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यानंतर त्यांनी संध्याकाळी ‘मीट द प्रेस'च्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी घणाघाती टीका केली आहे. 

मोदींच्या नौटंकीला देशातील जनता आता विसरणार नाही. दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईने जनतेचे डोळे उघडले आहेत. मोदी शेतकऱ्यांच्या भल्याच्या नुसत्या बाता करतात, पण मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवरून असे वाटते की, देशात फक्त अदानी आणि अंबानी हेच शेतकरी आहेत बाकी कुणी नाही, खरं तर मोदींना नटसम्राट हा किताब दिला पाहिजे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. 

हेही वाचा - वाघ बघायला जायचंय? उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात चला; ५ नव्या पाहुण्यांचं दर्शन  

अडवाणींच्या वेळी डोळ्यांत पाणी आलं नाही 

खासदार गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कालावधी समाप्त झाला. त्यावेळी त्यांनी निरोप देताना राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. त्यांचे अश्रू साऱ्या देशाने बघितले. मग हेच अश्रू लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि नितीन गडकरींसाठी का नाही ओघळले,? २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा मोदींचे सरकार आले. तेव्हा त्यांनी आधी सभागृहाच्या पायऱ्यांवर डोकं टेकवलं त्यानंतर प्रवेश केला. तेव्हा सेंट्रल हॉलमध्ये मी होतो. तेथे एका बाजूला अडवाणी बसले होते. तेव्हा मोदी का भावुक झाले नाहीत?असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे.

काँग्रेसला राज्यता नंबर १ पक्ष करणार 

महाराष्ट्रात कॉंग्रेस चौथ्या क्रमांकाचा पक्ष आहे. क्रमांक १ वर आणण्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागणार नाही. आज राज्यभरात कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. पक्षश्रेष्ठींनी राज्याला नवी टीम दिली आहे. अजूनही राज्याच्या संघटनेमध्ये काही नवे चेहरे येतील. आमचे कार्यकर्ते जनतेमध्ये पोहोचतील आणि लवकरच कॉंग्रेसला राज्यात नंबर १ क्रमांक मिळवून देतील असंही नाना म्हणाले. 

हेही वाचा - अमरावतीत कोरोना रुग्णांचा विस्फोट; प्रशासनाच्या पायाखालची सरकली जमीन 

यावेळी प्रेस क्लबमध्ये त्यांच्यासोबत आमदार अभिजित वंजारी, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी मंत्री आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार होते. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image