अमरावतीत कोरोना रुग्णांचा विस्फोट; प्रशासनाच्या पायाखालची सरकली जमीन  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा यासर्व बाबी रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरत असून दरदिवशी नवीन रुग्णसंख्या समोर येत आहे. 

मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा यासर्व बाबी रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरत असून दरदिवशी नवीन रुग्णसंख्या समोर येत आहे. 

अमरावतीत कोरोना रुग्णांचा विस्फोट; प्रशासनाच्या पायाखालची सरकली जमीन 

अमरावती : कोरोना रुग्णांचा ग्राफ सातत्याने वाढत चालला असून आज तर रुग्णवाढीने नवीन विक्रम स्थापित केला. एकाच दिवशी तब्बल ३५९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. एकूण रुग्णांची संख्यासुद्धा २३ हजार ८३५ वर जाऊन पोहोचली. मागील काही महिन्यांचा आलेख बघता बुधवारची रुमागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मास्कचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा यासर्व बाबी रुग्णवाढीसाठी कारणीभूत ठरत असून दरदिवशी नवीन रुग्णसंख्या समोर येत आहे. ग्णवाढ मोठी मानली जात आहे.  रुग्णवाढीमुळे आता प्रशासनावर सर्वच स्तरावरून ताशेरे ओढले जात आहेत. 

हेही वाचा - भांडणात महिलेनं घेतला चावा अन् तुटला अंगठा: नळाच्या पाण्यावरून दोन गटात घडला थरार 

तीन दिवसांपूर्वी अमरावतीत दाखल झालेल्या केंद्रीय पथकातील अधिका-यांनी सुपर स्पेशालिटीमध्ये बैठकीत रुग्णवाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. वाहनचालक, व्यावसायिक, फेरीवाले, ऑटोरिक्षाचालक, दुकानदार यापैकी अपवाद वगळता कुणीही मास्क घालताना दिसत नाही. प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.  

...अखेर कारवाईला सुरुवात

मास्कचा वापर न करणा-यांवर अद्याप कुठलीही कारवाई केली जात नसल्याने नागरिक बिनधास्त होते. मात्र रुग्णसंख्या वाढत गेल्यानंतर प्रशासनाने आता मास्क न वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. धोक्याची तसेच चिंतेची बाब म्हणजे अमरावतीमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट ५९ टक्क्यांवर पोहोचला आहे. मध्यंतरी हीच संख्या कमी झाली होती. मात्र आता कोरोना सुसाट वेगाने वाढत असल्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके पुन्हा चुकले आहेत.

हेही वाचा - बेपत्ता असलेल्या तरुणांचं लोकेशन मिळालं नाल्याजवळ; जाऊन बघताच दिसलं थरकाप उडवणारं दृश्य  

मागील दहा दिवसांतील आकडेवारी 

१ फेब्रुवारी ९२ रुग्ण 
२ फेब्रुवारी ११८ रुग्ण 
३ फेब्रुवारी १७९ रुग्ण 
४ फेब्रुवारी १५८ रुग्ण 
५ फेब्रुवारी २३३ रुग्ण 
६ फेब्रुवारी १९९ रुग्ण 
७ फेब्रुवारी १९२ रुग्ण 
८ फेब्रुवारी २३६ रुग्ण 
९ फेब्रवारी १८३ रुग्ण 
१० फेब्रुवारी ३५९ रुग्ण 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

टॅग्स :Amravati