‘निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय?’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

‘निवडणूक आयोग कोणाच्या इशाऱ्यावर काम करतेय?’

नागपूर : राज्यामध्ये नगर पंचायतीच्या निवडणुका तसेच भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या. ओबीसी आरक्षण आणि कोरोनाची स्थिती हे सगळे व्यवस्थित झाल्यानंतरच निवडणुका घ्याव्या, अशी मागणी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला केली होती. निवडणूक आयोग (Election Commission) कोणाचे आहे हे आता स्पष्ट झाले आहे. निवडणुका लागल्या तर काँग्रेसची (congress) तयारी आहे. काँग्रेस एकजुटीने काम करीत आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) म्हणाले.

देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांची लवकरच घोषणा होणार आहे. पाच राज्यांची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे ते कोणाच्याही विरोधात ईडी, सीबीआय लावू शकतात. आम्ही लोकशाहीला मानतो. आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ, असेही नाना पटोले (Nana patole) म्हणाले.

हेही वाचा: … म्हणूनच आशिष शेलारांना मिळाली धमकी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडकून राहणे ही मोठी चूक आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. देशाने अगोदरच दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. देशातील जनतेला भाजप नौटंकीबाज आहे, हे समजले आहे, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी निवडणूक आयोगालाही लक्ष केले.

महिलांविषयी सांभाळून बोलायला हवे

महिलांविषयी बोलणं गैर आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविषयी जे बोलले गेले त्याचा धिक्कार करतो. महिलांविषयीची चर्चा तसेच जे बोलले जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केल्या जात असलेल्या टीका-टिप्पणीवरही नाराजी व्यक्त करतो, असेही नाना पटोले (Nana patole) म्हणाले.

Web Title: Nana Patole Election Commission Congress

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top