
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत (nagpur municipal corporation election) काँग्रेसमध्ये होणारी गटबाजी, हेवेदावे, पाडापाडीचे राजकारण यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (maharashtra congress president nana patole) यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. यावेळी कार्यकर्त्यांनाच उमेदवार ठरवण्याचे आवाहन त्यांनी केले. (nana patole take meeting of congress party worker for nagpur municipal corporation election)
नाना पटोले सध्या नागपूरच्या दौऱ्यावर असून शनिवारी त्यांनी दक्षिण-पश्चिम, पश्चिम आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्यावेळी झालेल्या टोकाच्या गटबाजीमुळेच काँग्रेस नगरसेवकांची संख्या २८ येऊन ठेपली आहे. याची गंभीर दखल घेऊन भविष्यात याची पुनरावृत्ती व्हायला नको असेही पटोले यांनी बजावले. शहरात दीडशे वॉर्ड आहेत, उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या हजाराच्यावर असते. एकाला तिकीट दिल्यास दुसरा नाराज होतो. पराभूत झालेला उमेदवार आधी विजयाचे मोठमोठे दावे करतो. नंतर नेते व कार्यकर्त्यांवर खापर फोडतो. त्यामुळे यापुढे महापालिकेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनाच उमेदवार निवडण्याची मुभा दिली जाणार आहे. कुठल्याही प्रभागात नेत्यांमार्फत उमेदवार लादल्या जाणार नाही. सर्व कार्यकर्त्यांनी मिळून एक नाव ठरवायचे आहे. त्याला विजयी करण्याची जबाबदारी सर्वांची राहील. नंतर आमच्या नावाने बोटे मोडू नका, असे सांगून पटोले यांनी पक्षाचे प्रामाणिक काम करणार, निष्ठावान आणि सक्रिय कार्यकर्त्याचा महापालिकेसाठी विचार केला जाईल असे स्पष्ट केले.
मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व विदर्भाचे प्रभारी चंद्रकांत हंडोरे, शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार ॲड. अभिजित वंजारी, महासचिव विशाल मुत्तेमवार,उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, मुजीब पठाण, डॉ.गजराज हटेवार, संजय महाकाळकर, संदेश सिंगलकर, प्रा.दिनेश बानाबाकोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
समित्या स्थापन करा -
दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातून सुमारे १५ नगरसेवक निवडून आणण्याची ग्वाही यावेळी विकास ठाकरे यांनी दिली. याकरिता कार्यकर्त्यांनी बूथ,वार्डनिहाय जनतेच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडव्यावा. ब्लॉक अध्यक्षांची समन्वय ठेऊन समित्या स्थापन कराव्यात असे आवाहन ठाकरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.